मुंबई : अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी चित्रपटाच्या समर्थनात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी चित्रपटात अनेक गोष्टी काल्पनिक दाखवल्या असल्याचे म्हणत चित्रपटावर आक्षेप नोंदवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या दोन गटातील वादावर आता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

संकर्षणने या विषयावर बोलताना सांगितलं की, ”
कलाकृतीकडे कला म्हणून पाहावं, त्याचा समाजावर, राजकारणावर, संस्कृतीवर, धर्मावर आपण का बदनाम करून घ्यायचा? असा सवाल त्यानं उपस्थित केला. तसंच “तुम्हाला नागराज सर आवडत असेल, तर तुम्ही तो पाहा, बच्चन सर आवडत असतील तरी पाहा. त्यातून काहीतरी अर्थ काढायचा आणि तो समाजावर लादायचा आणि त्याला बरबटीत करून टाकायचं? हे सर्व कशाला? असा सवाल त्याने केला. झुंडचे कलाकार नवीन आहे, ते आमच्याकडे आले होते, तो का नको बघायला? झुंड पाहिला पाहिजे.’

“तर दुसरीकडे काश्मीर फाईल्स आहे, तो सुद्धा पाहायला पाहिजे. काश्मीरमधील लोकांचं ते वास्तव आहे, तर त्याला धार्मिक रंग का द्यायचा? कलाकृतीकडे कलाकृती म्हणून पाहिल्यावर हे प्रश्न निर्माण होत नाहीत. पी.के. वर देखील लोकांनी असे सवाल उपस्थित केले होते. ते मनोरंजन आहे आपण त्याला मनोरंज म्हणून पाहावं, मनोरंजन करून घ्यावं. हसू आलं की हसावं, रडू आलं की रडावं. त्याला धर्म, रंग, जात, हे कोंदनं लावू नये असं मला वाटत असल्याचं” संकर्षण यावेळी म्हणाला आहे.