chahl
You too will smile when you see Chahal Royal welcome ...

नवी दिल्ली : आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यास आता अवघा काही कालावधीच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आयपीएल खेळणारे सर्व खेळाडू हळू-हळू मुंबईत पोहोचू लागले आहेत. यातच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज युजवेंद्र चहलही मुंबईत दाखल झाला आहे. याचा एक व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे युजवेंद्र चहलचा हा व्हिडीओ पाहून तुम्हला हसू यईल.

या व्हिडिओच्या सुरुवातीला काही ‘कार्टून’ युझवेंद्र चहलचे स्वागत करतात त्यानंतर व्हिडिओमध्ये चहल बोलताना दिसत आहे. चहलचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच हसू येते.

IPL 2022 26 मार्चपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी खेळाडूंनी आपापल्या संघात सामील होण्यास सुरुवात केली आहे. चहल देखील त्याच्या नवीन संघात सामील झाला असून त्याचे फ्रँचायझीने त्याचे खास स्वागत केले आहे. चहल सोबत त्याची पत्नी धनश्री देखील या व्हिडिओत दिसत आहे.