मुंबई : एसएस राजामौली यांच्या RRR ने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या यशानंतर नुकतीच मुंबईत आरआरआरची सक्सेस पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये अनेक मोठे मोठे कलाकार उपस्थित होते. यातच या पार्टीत अभिनेत्री राखी सावंतनेही हजेरी लावली होती. यावेळीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माञ यातील एका व्हिडिओमुळे करण जोहर आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

राखी सावंतने या पार्टीतील काही व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये राखी सावंत पहिल्यांदा राम चरणशी बोलत आहे. ती कॅमेरा त्याच्याकडे दाखवते आणि म्हणते ‘मी कुठे आहे, माझा आवडता हिरो…’ हे ऐकून राम चरणही हसतो आणि राखील प्रेमळ प्रतिक्रिया देतो. यानंतर राखी सावंत पुढे जाते तिथे तिला अयान मुखर्जी भेटतो. तोसुद्धा राखीला स्माईल देत पुढे जातो.

त्यानंतर राखी सावंतने कॅमेरा करण जोहरकडे वळवते. राखी करणला व्हिडीओमध्ये बोलावत असते. परंतु करण कोणासोबत तरी बोलत असतो आणि तो राखीकडे अजिबात लक्ष देत नाही. तो सतत कोणाशी तरी संभाषणात व्यस्त असतो. आता करण जोहर या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. राखी सावंतसोबतच्या वागणुकीमुळे करण जोहरला प्रचंड ट्रोल केले जात आहे.