आयफोन 13 (IPhone 13) वर सध्या जबरदस्त ऑफर दिली जात आहे. म्हणजेच iPhone 13 खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही ऑफर अमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्ट (Flipkart) वर नाही तर रिलायन्स डिजिटल वर दिली जात आहे.
रिलायन्स डिजिटल (Reliance Digital) ने आयफोन 13 विक्रीची घोषणा केली आहे. कंपनीने याला डिजिटल डिस्काउंट डेज सेल असे नाव दिले आहे. आजपासून ही विक्री सुरू झाली आहे. रिलायन्स डिजिटल डिस्काउंट डेज सेल 17 एप्रिलपर्यंत चालेल.
कंपनी स्मार्टफोन (Smartphones) , स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, लॅपटॉप, एसी, वॉशिंग मशीन आणि स्वयंपाकघरातील इतर उपकरणे यासारख्या श्रेणींमध्ये सूट देत आहे. रिलायन्स डिजिटलच्या किरकोळ किंवा ऑनलाइन स्टोअरमधून खरेदीदार डीलचा लाभ घेऊ शकतात.
रिलायन्स जिओ (Jio) निवडक कार्ड्सवर बँक डिस्काउंट देखील देत आहे. कंपनी HDFC बँक कार्ड्सवर 7.5% ची झटपट सूट देत आहे. याशिवाय 2000 रुपयांपर्यंतचे कूपनही दिले जात आहे.
80,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पादनांच्या खरेदीवर 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. यामध्ये आयफोन 13 ची विक्रीही चांगलीच होत आहे. तुम्ही iPhone 13 चा बेस व्हेरिएंट फक्त 61,999 रुपयांना खरेदी करू शकता.
त्याची मूळ किंमत 79,999 रुपये आहे. या ऑफर किमतीमध्ये पोस्ट कॅशबॅक, इन-स्टोअर डिस्काउंट, एक्सचेंज व्हॅल्यू आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. iPhone 13 तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तुम्ही ते 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी करू शकता.
आयफोन 13 व्यतिरिक्त रिलायन्स डिजिटलवरील इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. नव्याने लाँच झालेल्या Samsung Galaxy S22+ चा ग्रीन कलर व्हेरिएंट रिलायन्स डिजिटलकडून 84,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो