Yamaha : (Yamaha) यामाहा इंडियाने यामाहाच्या Aerox 155 (Yamaha Aerox 155) या स्कूटरचे MotoGP (Moto GP)व्हेरिएन्ट लॉन्च केले आहे. बाजारात ही एक टक्कर देणारी स्कुटर ठरेल. जाणून घ्या या स्कुटरच्या सर्व फीचर्सबद्दल.

इंजिन

Yamaha Aerox 155 MotoGP एडिशन 155cc BS6 सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 14.79 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर जास्तीत जास्त 13.9 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कंपनीने या इंजिनमध्ये आपले व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्ट्युएशन (VVA) तंत्रज्ञान वापरले आहे.

या रंगांमध्ये उपलब्ध आहे

नवीन Aerox 155 MotoGP तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्रे वर्मिलिअन, मेटॅलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्लू मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने ही स्कूटर सुमारे वर्षभरापूर्वी देशात लाँच केली होती.

वैशिष्ट्ये

यामाहाने (Yamaha Aerox 155) ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक ऑल-एलईडी हेडलॅम्प, पुढच्या बाजूला सस्पेंशन ड्युटीसाठी टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग-लोडेड शॉकर्स प्रदान केले आहेत. तसेच यामध्ये 14 इंची मोठ्या अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरला फ्रंटला डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनल ABS सह मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतो.

किंमत

यामाहाने या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.39 लाख ते 1.41 लाख रुपये ठेवली आहे. ही स्कूटर बाजारपेठेत Aprilia SXR 160 शी स्पर्धा करेल.