मुंबई : आपण मीडियामध्ये अनेकवेळा पाहिले आहे की, अनेक अभिनेत्री त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे उप्स मुमेंटच्या शिकार होत असतात. त्यांचे हे व्हिडिओ काही क्षणात व्हायरलं होतात. असाच एक उप्स मुमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ कोणत्या अभिनेत्रीचा नाही तर हॉलिवूड गायिका कॅटी पेरीचा आहे.
त्याचे झाले असे की, अमेरिकन आयडॉल शोमध्ये कॅटी लाईव्ह परफॉर्मन्स देत होती. यावेळी कॅटी तिचे ‘टीनएज ड्रीम’ हे हिट गाणे म्हणत होती. या दरम्यान ती खाली वाकली असता तिने घातलेली चामड्याची पँट मागून फाटली आणि कॅटी उप्स मुमेंटचा शिकार झाली. यावेळी तिथे बसलेले प्रेक्षक या घटनेला उघड्या डोळ्यांनी बघतच राहिले. कॅटीच्या या फंक्शनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पुढे व्हिडिओमध्ये दिसते की, कॅटी लगेच तिथल्या क्रू मेंबर्सना विचारले की, ‘मला टेप्स मिळू शकतात का?’ त्यानंतर क्रू मेंबर्स पिवळ्या रंगाची टेप आणून पॅंटच्या फाटलेल्या भागात टेप लावतात. यानंतर कॅटी पेरी तिचा परफॉर्मन्स पूर्ण करते.
दरम्यान, कॅटीला अशा क्षणाचा बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिला 2018 मध्येही अशा प्रकारच्या मुमेंटला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.