
नवी दिल्ली : 2 एप्रिल कोण विसरू शकेल? 11 वर्षांपूर्वी या दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करून 28 वर्षांनंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
यापूर्वी टीम इंडियाने 1983 मध्ये फक्त एकदाच हे विजेतेपद पटकावले होते. तेव्हा कॅप्टन कपिल देव होते. क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा विश्वचषक होता. याआधी दोन्ही वेळा वेस्ट इंडिजने विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने 2011 मध्ये 1983 नंतर दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार धोनी, अष्टपैलू युवराज सिंग आणि सलामीवीर गौतम गंभीर यांनी चमकदार कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 274 धावा केल्या. त्यानंतर महेला जयवर्धनेने १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 4 गडी गमावत 277 धावा केल्या आणि विजेतेपदावर नाव कोरले.
फायनलमध्ये गौतम गंभीरने टीम इंडियासाठी सर्वाधिक 97 धावांची खेळी केली. त्याचे शतक हुकले. या सामन्यात कर्णधार धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला. धोनीने गंभीरसोबत 109 धावांची शतकी भागीदारी केली होती. शेवटी त्याने युवराज सिंगसोबत नाबाद 54 धावांची भागीदारी केली. युवीने नाबाद 21धावा केल्या होत्या.
या संपूर्ण विश्वचषकात युवराज सिंग, सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांचाही मोलाचा वाटा आहे, 2011 च्या विश्वचषकात युवराजला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. बॉल आणि बॅटने त्याने संपूर्ण टूर्नामेंटचमकदार कामगिरी केली होती. युवीने विश्वचषकात 362 धावा केल्या होत्या आणि १५ महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या होत्या.
सचिनने टीम इंडियासाठी सर्वाधिक 482 धावा केल्या. तर झहीर खानने सर्वाधिक २१ विकेट घेतल्या. हे दोघेही एकूण यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते.