team austreliya
Women's World Cup 2022: Team India beat Australia in the semifinals

नवी दिल्ली : टीम इंडियाला महिला वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रंगतदार झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने  टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया समोर 278 धावांचे आव्हान ठेवले, जे महिला विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. याचा अर्थ संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले आहेत. यासोबतच भारताचा 5 सामन्यांमधला हा तिसरा पराभव आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली दुसरी सर्वोच्च धावसंख्या केली होती. प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 277 धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियन महिलांनी केवळ 4 विकेट्स गमावून ही धावसंख्या गाठली आणि 6 विकेट्सने विजय मिळवला.

278 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने शानदार कामगिरी केली. हॅन्स आणि हीली यांच्यात 121 धावांची भागीदारी झाली. यानंतर कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिस पेरी यांच्यात 103 धावांची भागीदारी झाली. या दोन भागीदारींनी संघाला विजयच्या खूप जवळ आणले.