मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेत सतत येणाऱ्या वेगवेगळ्या ट्विस्टमुळे मालिका कायम चर्चेत आणि ट्रेंडिंगला पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत यश नेहावर नाराज आहे. यशची ही नाराजी आणि नेहाचं हे खोटं बोलणं यामुके दोघांच्या नात्यात दुरावा येणार असल्याचे म्हंटले जात आहे.
माहितीनुसार, नेहाच्या खोट्या वागण्यामुळं यशला नेहाचा राग आला आहे. याविषयावर तो समीरशी बोलताना दिसत आहे. समीर त्याची समजूत काढताना दिसत आहे. मात्र तिकडं नेहासमोर आजोबा एक वेगळीच अट ठेवतात. कदाचित यामुळे नेहा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज उठल्यावर आजोबांना नेहाचा चेहरा पाहूनचं दिवसाची सुरूवात करायची आहे.
यामुळे नेहाला यशच्या घरी राहायला यावं लागणार आहे. मंग परीकडं कोण लक्ष देणार, तिचं काय होणार हा देखील प्रश्न आहे. आता नेहा यातून कसा मार्ग काढते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय या खोट्यामुळे यश आणि नेहाच्यात कायमचा दुराव येणार का..याची देखील उत्सुकता लागली आहे.