मुंबई : साऊथ सुपरस्टार महेश बाबू लवकरच ‘सरकारू वारी पाता’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळे महेश बाबूने आता बॉलीवूडमध्ये देखील यावे असे चाहत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चावर महेश बाबूने वक्तव्य केले आहे.
वास्तविक, महेश बाबू नुकतेच मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पोहोचले होते. जिथे त्यांना बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याबद्दल विचारण्यात आले. ज्यावर महेश बाबू म्हणाले, “मला हिंदी चित्रपट करण्याची गरज नाही. मी फक्त तेलुगु चित्रपट करू शकतो. तसेच, मला हॉलिवूडच्या कोणत्याही प्रोजेक्टबद्दल माहिती नाही.” असं म्हणत महेश बाबूने सध्या हॉलिवूडमध्ये आणि बॉलीवूड मध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, ‘सरकार वारी पाता’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर यात महेश बाबूसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश दिसणार आहे आणि हा चित्रपट 2 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाले आहे यामुळे चित्रपटाप्रति प्रेक्षकांनमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.