shikhar dhawan
Will Shikhar Dhawan get a place in Team India through IPL 2022 ?; Announcement of 'Gabbar' before the start of the league

नवी दिल्ली : यंदाची आयपीएल (IPL 2022) खास आहे. कारण यावेळी मैदानात 8 नव्हे 10 संघ उतरतील. आणखी एक खास कारण म्हणजे वर्षाच्या शेवटी टी -20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील खेळाडूंना विश्वचषक संघाचा भाग बनण्याची मोठी संधी असेल. त्यामुळे आता टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी स्फोटक फलंदाज शिखर धवनला आयपीएलमध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे.

शिखर धवन गेल्या काही काळापासून टीम इंडियाचा नियमित खेळाडू नाही. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला धवन यावेळी पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाचा गब्बर या आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहे.

आयपीएल ही धवनसाठी मोठी संधी

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना धवनने सांगितले की, त्याला माहित आहे की आयपीएल ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. तो म्हणाला, “टी-20 विश्वचषक आता येणार आहे. मला माहित आहे की मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर मी संघाचा भाग होऊ शकतो. मी स्वतःसाठी ध्येये ठेवत नाही. मी माझ्या खेळाचा आनंद घेतो. मी माझ्या तंदुरुस्तीचा आणि खेळातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो ज्यामुळे मला फायदा होतो. माझी तयारी मजबूत असेल तर मी सर्व काही करू शकतो. मला खात्री आहे की मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेन. जर मी हे केले तर मी विश्वचषक संघाचा भाग होऊ शकतो. हे होईल की नाही वेळच सांगेल. पण या सगळ्यांचा मी माझ्यावर काहीही परिणाम होऊ देणार नाही.”

पंजाब किंग्जचा एक भाग असल्याबद्दल धवन म्हणाला, “मला पंजाब किंग्जचा भाग बनून आनंद झाला आहे. कारण मी पंजाबी आहे त्यामुळे माझा त्याच्याशी संबंध खूप घट्ट आहे. दिल्लीप्रमाणेच पंजाबही माझे घर आहे. मला लहानपणापासून पंजाबी गाण्यांची खूप आवड आहे. पंजाबी कुटुंबातील असल्याने मी पंजाबीही बोलू शकतो, त्यामुळे चाहत्यांशी माझे वेगळे नाते आहे. संघासाठी आणि माझ्यासाठी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याची संधी आहे.