मुंबई : सध्या इंडस्ट्रीत अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता आलिया आणि रणबीर लग्न बंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, हे कपल 17 एप्रिलला लग्न करणार आहे. यातच आता या लग्नसंबंधीत आणखी अनेक गोष्ट समोर येत आहेत.
बातम्यांनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. तसेच, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न खूप भव्य होणार आहे. कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सात फेरे घेतील. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे विधी 13 एप्रिलपासून सुरू होत आहेत. लग्नाचे विधी 3-4 दिवस चालतील.
लग्नानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या हनीमूनसाठी कुठे जाणार आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु रणवीर सिंग आणि आलिया भट्ट करण जोहरच्या आगामी चित्रपट ‘रॉकी आणि रानी की लव्हस्टोरी’साठी गाणे शूट करणार असल्याचे बोलले जात आहे. हे गाणं स्वित्झर्लंडला शूट होणार असून कदाचित रणबीर कपूर येथे आलिया भट्टसोबत सामील होऊ शकेल.