नवी दिल्ली : राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धूने कॉमेडी शोमध्ये आपली छाप पडली होती. आता नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा नव्या शोसह पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ‘द कपिल शर्मा शो’चा सीझन लवकरच संपणार आहे आणि हा शो संपताच आणखी एक कॉमेडी शो येणार आहे.
‘द कपिल शर्मा शो’ छोट्या ब्रेकवर जाणार आहे. शो ऑफ एअर झाल्यानंतर, कोणता शो त्याची जागा घेईल, हे अद्यापही कळलेले नाही, या बातमीसोबतच नवज्योत सिंग सिद्धूही या शोद्वारे पुनरागमन करू शकतात.
‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्याच्या बातमीनेचाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यामुळे सोनी टीव्हीने नुकताच एक नवीन कॉमेडी शो सुरू करण्याची घोषणा केली. ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ असे या नवीन शोचे नाव आहे, ज्याचा टीझर नुकताच चॅनलने शेअर केला आहे. ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’चा टीझर समोर आल्याने लोकांनी असा अंदाज लावला की ‘द कपिल शर्मा शो’च्या जागी हाच शो आणला जात आहे. आता या शोद्वारे नवज्योतसिंग सिद्धू टीव्हीवर परत येऊ शकतात, असा अंदाज सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून लावला जात आहे.
नवज्योत सिंग सिद्धू ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ जज करायचे. हा तोच शो आहे, ज्याने भारती सिंग, कपिल शर्मा सारख्या कलाकारांना संधी दिली आणि त्यांना आज स्टार बनवले. नवज्योत सिंग सिद्धू याआधी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसला होता. पण 2019 मध्ये वादग्रस्त वक्त्यामुळे त्यालाशोमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले पण पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या कपिलच्या शोमध्ये अर्चना पूरण सिंहने नवज्योत सिंग सिद्धूची जागा घेतली आहे.