मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या खाजगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. अनेक राजकीय नेत्यांसोबत त्याच्या सतत होणाऱ्या भेटींमुळे अक्षय लवकरच राजकारणात येऊ शकतो असे म्हंटले जाते. या सर्व चर्चांदरम्यान अक्षय नुकताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखे पसरत आहेत.
सीएम चौहान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या भेटीची माहिती दिली आहे. सीएम चौहान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘चित्रपट अभिनेता अक्षय कुमारला आज त्यांच्या निवासस्थानी भेटून आनंद झाला. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रमुख सामाजिक विषयांवरील तुमच्या चित्रपटांनी जनजागृतीचा संदेश दिला आहे.’ असं या पोस्टमध्ये सीएम चौहान यांनी लिहिले. या भेटीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्नांना तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे.
आज निवास पर फिल्म अभिनेता श्री @akshaykumar जी से मुलाकात आनंदपूर्ण रही। इस दौरान कई मुद्दों पर चर्चा हुई। प्रमुख सामाजिक विषयों पर आपकी फिल्मों ने जागरूकता का संदेश दिया है। pic.twitter.com/mXdKoYuslF
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 14, 2022
दरम्यान, माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने भोपाळमध्ये आहे. यामुळे येथील नेते अक्षय कुमारसोबत भेट घेत असल्याचे कळत आहे. यापूर्वी अक्षयने राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांचीही भेट घेतली होती.