मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी मुंबईतील वास्तु अपार्टमेंटमध्ये लग्न केले. हे लग्न होताच रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्या पती ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झालेल्या दिसत आहेत.

नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. यामध्ये त्या मुलगा रणबीर कपूरसोबत दिसत आहेत. यावेळी रणबीर वराच्या पोशाखात दिसत आहे. हा फोटो शेअर करताना नीतू यांनी दिलेल्या कॅप्शन ने सर्वांना भावुक केले आहे. त्यात त्यांनी लिहिलेकी, ‘हे कपूर साहेबांना समर्पित आहे, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे.’ नीतू यांची ही पोस्ट पाहता सर्वांना ऋषीकपूर यांची आठवण झाली आहे.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काल 14 एप्रिलला लग्न केले आहे. या लग्नात त्यांच्या कुटुंबातील लोक आणि काही मित्र पारिवार उपस्थित होता.