मुंबई : संपूर्ण कपूर कुटुंब रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नात व्यस्त आहे. रणबीरची आई नीतू कपूरही आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नासाठी आनंदी आहे. तसेच लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. पण यावेळी नीतू कपूर थोड्या भावूक झालेल्या दिसल्या. यावेळी नीतू पती ऋषी कपूर यांना खूप मिस करत आहेत.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक होते. या दोन दिग्गज कलाकारांची चित्रपटाच्या सेटवर भेट झाली, भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न करून आपला संसार थाटला. या दोघांना रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर ही दोन मुलं आहेत. ऋषीने मुलगी रिद्धिमाचे लग्न केले, पण मुलगा रणबीरच्या लग्नाआधीच ऋषी हे जग सोडून गेले. बुधवारी मेहंदी कार्यक्रमात नीतू भावूक झालेल्या दिसल्या. ऋषी यांच्या आठवणीत नीतूने आपल्या मेहंदीमध्ये ऋषी कपूर यांचे नाव काढले.
मेहंदी फंक्शनदरम्यान नीतू कपूर खूप भावूक झाल्या होत्या, त्यांच्या डोळ्यातून ते अश्रू थांबू शकले नाहीत. मुलाच्या लग्नाच्या आनंदाच्या प्रसंगी नीतूला पती ऋषी कपूरची खूप आठवण आली. नीतूने तिच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर मौन बाळगले असले तरी, हातातील मेहंदीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नीतूच्या हातावर मेहंदीच्या सुंदर डिझाइनमध्ये ऋषींचे नाव लिहिले आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मेहंदी सोहळ्यात नीतू कपूरची मेहंदी चर्चेचा विषय बनली आहे. नीतू नेहमीच खूप आनंदी आणि मस्त मौला दिसते, पण कुठेतरी ऋषी कपूरच्या आठवणी वेदना देतात.