मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम विनोदी कलाकार आहे. तिने तिच्या सेन्स ऑफ उमरनने दिलेली उत्तर चाहत्यांना खूप आवडतात. अश्याच मजेदार स्टाईलसोबत विद्याने नुकतेच तिच्या चाहत्याला एक उत्तर दिले आहे.
विद्याने सोमवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ सत्राचे आयोजन केले होते. यादरम्यान, विद्याने चाहत्यांशी संवाद साधताना तिच्या उत्तराने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. एका युजरने विद्याला विचारले की ती हॉट फोटोशूट का करत नाही? यावर विद्याने दिलेले उत्तर तिच्या चाहत्यांना तर आवडलेचं आहे मात्र, हे उत्तर सध्या जोरदार चर्चेतही आले आहे.
प्रश्नाचे मजेशीर उत्तर देताना विद्या म्हणाली, ‘आता गरम होत आहे आणि मी शूटिंग करत आहे. त्यामुळे हे हॉट फोटोशूट झाले ना’. विद्याकडून हे उत्तर कोणालाच अपेक्षित नव्हते. मात्र तीच्या उत्तराने सर्वजण तिचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विद्या बालन लवकरच ‘जलसा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटात विद्यासोबत शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोन आघाडीच्या अभिनेत्रींना एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत.