मुंबई : आपण नेहमी पाहतो की टॉलीवूडचे चित्रपट बॉलीवूडमध्ये कायम बक्कळ कमाई करत असतात. पण त्या मानाने बॉलीवूडबद्दल पाहिले तर हे चित्रपट साऊथ इंडस्ट्रीत तेवढे चालत नाहीत. यामुळे आता बरेचसे बॉलीवूड कलाकार साऊथ इंडस्ट्रीत आपलं पाऊलं ठेवत आहेत. यातच आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानही लवकरच सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासोबत ‘गॉडफादर’ चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्तानं सलमाननं बॉलीवूड आणि टॉलीवूड याविषयी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

बॉलीवूड आणि टॉललीवूड मधील अंतर पाहता सलमान म्हणाला, “बॉलीवूडला आणखी यशस्वी व्हायचं असल्यास त्याला आणखी हिरोएझमची गरज आहे. जो सध्या तुम्हाला टॉलीवूडमध्ये पाहायला मिळतो. मी बऱ्याच काळापासून चिरु गरु यांना ओळखतो. ते आणि आता त्यांचा मुलगा रामचरण हे माझे मित्र आहेत. रामचरणनं तर आरआरआरमध्ये जबरदस्त भूमिका केली आहे. ते पाहून मी तर प्रभावित झालो आहे. हे सर्व मी जेव्हा पाहतो तेव्हा काही प्रश्न मला पडतात. त्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, बॉलीवूडच्या फिल्म्स या टॉलीवूडमध्ये का हिट होत नाहीत?”

“याचे कारण म्हणजे साऊथमध्ये सध्याच्या घडीला हिरोइझम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतो तेव्हा त्याला हिरोइझम पाहायचं असतं. त्यासाठी तो मोठं तिकिट काढून तुमचा चित्रपट पाहायला येतो. मात्र चित्रपटामध्ये त्याला हव्या त्या गोष्टी दिसत नाही तेव्हा तो निराश होतो आणि आम्ही सध्या हिरोइझम असलेले चित्रपट तयार करत नसल्याची खंत सलमाननं यावेळी व्यक्त केली. त्यामुळे त्याचा मोठा फटका आम्हाला बसतो. आता जर कमाई करायची असेल तर हिरोइझम केंद्रित चित्रपट आपल्याला तयार कराव्या लागतील.” असं सलमान म्हणाला.

पुढे सलमान म्हणाला की, “हिरोइझम हे नेहमीच काम करतं. तो प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. त्यानिमित्तानं प्रेक्षकांशी वेगळं नातं दिग्दर्शक कनेक्ट करतो. आम्ही हे सगळं सलीम जावेद यांच्या काळात पाहिलं आहे. हिरोइझम काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. तो बॉलीवूडचा काळ सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात टॉलीवूडमधील चित्रपट हटक्या पद्धतीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या तुलनेत जास्त हिरोइझम आहे” असं सलमाननं म्हटले आहे.