मुंबई : आपण नेहमी पाहतो की टॉलीवूडचे चित्रपट बॉलीवूडमध्ये कायम बक्कळ कमाई करत असतात. पण त्या मानाने बॉलीवूडबद्दल पाहिले तर हे चित्रपट साऊथ इंडस्ट्रीत तेवढे चालत नाहीत. याच संदर्भात सलमान खानने RRR चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन करताना एक प्रश्न विचारला होता जो खूप व्हायरल झाला होता. यात सलमानने विचारले होते की, बॉलीवूडचे चित्रपट साऊथमध्ये का चालत नाहीत? यावर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता नुकतेच ‘केजीएफ’ स्टार यशने सलमान खानच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर देताना यश म्हणाला, ‘असं अजिबात नाही. आमचे अनेक चित्रपट फ्लॉपही झाले आहेत. आमच्या चित्रपटांनाही याआधी असा प्रतिसाद मिळाला नव्हता पण आता डब व्हर्जन बनवायला सुरुवात केली आहे. लोकांना आता आमच्याद्वारे तयार केलेली सामग्री माहित आहे. मला वाटते की सुरुवातीच्या काळात लोक डबिंगला विनोद म्हणून घेत असत कारण लोक ते तसे पाहत नसत पण आता ज्या प्रकारची डबिंग होत आहे ते लोक आपल्या कथा सांगण्याच्या पद्धतीमुळे परिचित होत आहेत. हे एका रात्रीत घडले नाही.’ असं यश म्हणला.
दरम्यान, सुपरस्टार यशचा ‘KGF 2’ 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज हे कलाकार देखील झळकणार आहेत.