मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडल मराठी’ या रियालिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या शोमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून एकापेक्षा एक स्पर्धक आले होते. बरेच एपिसोड झाल्यानंतर आता लवकरच शोचा फिनालय होणार आहे. तर या ‘इंडियन आयडल मराठी’चा विनर कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

शोमध्ये सध्या महाराष्ट्राला त्यांचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. यात जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठी एक झुंज लागली आहे.

अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही ५ रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. तर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकताना पहायचे असेल, तर त्याला भरभरून ओट करा.