DIPAK CHAHAR
Who will get a chance to replace Deepak Chahar in IPL, find out the opinion of veterans

नवी दिल्ली : आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या फिटनेसमुळे संघ आता चिंतेत आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात सीएसकेने 14 कोटी रुपये खर्च करून दीपक चहरचा आपल्या संघात समावेश केला होता. अलीकडेच चहरला श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात दीपक चहरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करण्यात अपयशी ठरला.

दीपक चहरला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही, असे यापूर्वी अहवालात म्हटले होते. मात्र, त्याच्या खेळण्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दीपक चहर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार की नाही, यावर आकाश चोप्रा, न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी आणि वसीम जाफर यांसारख्या दिग्गजांनी सविस्तर चर्चा केली.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना डॅनियल व्हिटोरी म्हणाला, जर दीपक चहर आयपीएल 2022 ला चुकला तर तो सीएसकेसाठी मोठा धक्का असेल. अशा स्थितीत विदेशी गोलंदाजच त्याची जागा घेऊ शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.

“मला वाटते की त्यांना त्यांच्या परदेशी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागेल, त्यामुळे आता अॅडम मिलने आणि ख्रिस जॉर्डन यांना संधी मिळू शकते, ते दोन परदेशी गोलंदाज संभाव्यतः येऊ शकतात,” असे डॅनियल व्हिटोरी म्हणाला आहे. व्हिटोरी पुढे म्हणाला, मला वाटत नाही की दीपक चहरची जागा कोणताही देशांतर्गत गोलंदाज घेऊ शकेल, त्याच्या जागी आंतरराष्ट्रीय गोलंदाज आणावा लागेल.

यादरम्यान, जेव्हा आकाश चोप्राने डॅनियल व्हिटोरीला विचारले की दीपक चहरची जागा कोण घेऊ शकते. प्रत्युत्तरात व्हिटोरी म्हणाला, “मला वाटतं ते अॅडम मिलने असेल.” मला वाटते की मिलने अधिक धोकादायक ठरू शकतो, तो चेंडू स्विंग करू शकतो. त्याचवेळी वासिम जाफर आणि आकाश चोप्रा यांचा विश्वास आहे की महेंद्रसिंग धोनी चाहरऐवजी तरुणांवर अवलंबून राहू शकतो. यावेळी त्यांनी तुषार देशपांडे आणि सिमरनजीत सिंग यांची नावे घेतली.