mumbai

मुंबई : IPL 2022, चा 9वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज दुपारी ३.३० मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने मोसमाची सुरुवात दणदणीत विजयाने केली, तर मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्स पहिला सामना जिंकण्याच्या मार्गावर होता पण अखेरीस मध्यमगती गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात इशान किशन हिट ठरला तर कर्णधार रोहित शर्माही लयीत दिसला. मात्र, संघाची मधली फळी कमकुवत दिसत असून किरॉन पोलार्डनेही निराशा केली. दरम्यान, धुरंदर फलंदाज सूर्यकुमार यादव तंदुरुस्त असून तो खेळण्याची शक्यता आहे. तर यावेळी जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल.

आयपीएल 2008 च्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना एकदम परिपूर्ण सामना होता. संघाचे सर्व फलंदाज जबरदस्त लयीत दिसत आहेत. गोलंदाजीत संघाकडे स्पर्धेतील सर्वात संतुलित आक्रमण आहे. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल जोडीकडून पुन्हा एकदा तुफानी सुरुवातीची अपेक्षा असेल. सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा संजू सॅमसनवर असतील. फिनिशर म्हणून शिमरॉन हेटमायर डाव पूर्ण करण्याची जबाबदारी सांभाळेल. ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांची जोडी हिट ठरू शकते. मधल्या षटकांमध्ये अश्विन आणि चहल विरोधी संघाला अडचणीत आणू शकतात.

MI आणि RR कोणाचं पारडं जड?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान मुंबईने 13 सामने जिंकले असून राजस्थानने 11 सामने जिंकले आहेत, तर एक सामना रद्द झाला आहे.