बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या त्याचा आगामी दसवी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला.

त्यावर त्यांनी ट्विटर आणि ब्लॉगमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. याद्वारे त्यांनी त्यांना अभिषेकचा किती अभिमान वाटतो हे सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या एका कवितेचा दाखला देत त्याचे कौतुक केले आहे. त्यावेळी त्यांनी अभिषेकला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

अमिताभ यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. वडिलांच्या या पोस्टवर अभिषेकनेही कमेंट केली आहे. ट्विटरवर शेअर केली कविता माझ्या लाडक्या मुला, तू माझा मुलगा आहेस म्हणून तू माझा उत्तराधिकारी होऊ शकत नाहीस.

पण जो माझा उत्तराधिकारी असेल तो माझा मुलगा नक्की असेल – हरिवंशराय बच्चन, अशी पोस्ट अमिताभ यांनी शेअर केली आहे.

यासोबत त्यांनी अभिषेक तू माझा उत्तराधिकारी आहेस, मी बोललो म्हणजे बोललो, असेही लिहिले आहे. अमिताभ यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. यावर अभिषेकनेही वडीलांवरील प्रेम व्यक्त करत ‘माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहिलं, असे म्हटले आहे.