tilak varma
Who is Tilak Verma of Mumbai Indians? Find out

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात अशी अनेक नावे आहेत, ज्यांचे जग या लीगने पूर्णपणे बदलून टाकले. आयपीएल 2022 च्या मोसमात दिल्ली विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तिलक वर्मा हे देखील असेच एक नाव आहे ज्याने आपल्या संघर्षाच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण केली. त्याची कथा कोणत्याही माणसाला प्रेरणा देण्यासाठी पुरेशी आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या तिलककडे साधे प्रशिक्षण घेण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. पण ‘जिथे इच्छा आहे, तिथे मार्ग आहे’ असे म्हणतात तसेच झाले. प्रशिक्षक सलाम बायश यांनी ही जबाबदारी उचलली आणि तिलक याचे प्रशिक्षण सुरू केले.

अनेक संघर्षांनंतर, शेवटी तिलक याच्या आयुष्यात तो क्षण आला जेव्हा त्याला मुंबईने आयपीएल मेगा लिलाव 2022 मध्ये मूळ किमतीपेक्षा 8.5 पट जास्त किंमतीत विकत घेतले. मुंबईने त्याला 1.7 कोटींना विकत घेतले. तिलक 19 वर्षांखालील विजेत्या संघाचाही भाग होता. एक काळ असा होता की त्याला तुटलेल्या बॅटने फलंदाजी करावी लागत होती पण प्रशिक्षकाने त्याची प्रतिभा ओळखली आणि आज त्याला क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

तिलक वर्माने नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषकात 6 सामने खेळले ज्यात त्याला तीन डावात फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 86 धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 46 होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तिलक वर्माची बॅटही चांगली होती, हैदराबादकडून खेळताना त्याने दिल्लीविरुद्ध १३९ धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या टी 20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 15 टी 20 सामन्यांमध्ये 143.77 च्या स्ट्राइक रेटने 381 धावा केल्या आहेत ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर 75 आहे.

चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएलपर्यंतचा प्रवास केला असेल अशी अपेक्षा आहे. त्याने आयपीएलमध्येही आपली छाप पडली आणि मुंबईसाठी मॅन विनर म्हणून मैदानात उतरला.