मुंबई : कालपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. हा सामना पाहायला बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या टीमसोबत दिसला. मात्र, यावेळी त्याच्यासोबत एक मुलगीही दिसत होती. यामुळे हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये आर्यन खान कोलकाता नाईट रायडर्सला चिअर करताना दिसत आहे. यावेळी आर्यन खानने काळ्या रंगाच्या टी-शर्ट घातलेलं असून तो यात खूपच होतं दिसत आहे. तसेच, या फोटोंमध्ये आर्यन खानसोबत एका सुंदर मुलगीही दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हो मुलगी आहे कोण? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, ही मुलगी कोण आहे यावर अद्यापही कोणती महिति मिळालेली नाही.

दरम्यान, आर्यन खान लवकरच वेबसिरीजमधून बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान अनेक आयडियावर काम करत आहे. यामध्ये वेब सिरीज आणि फीचर फिल्म्सचा समावेश आहे. आर्यन ज्या विषयांवर काम करत आहे, त्यापैकी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली अॅमेझॉन प्राइमसाठी एक वेब सीरिज बनवली जाणार आहे. यासोबतच एक फीचर फिल्मही बनवण्यात येणार आहे. मात्र, सध्या या फीचर फिल्मबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.