मुंबई : युवा खेळाडू रसिक सलाम दार याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरकडून पदार्पण केले आहे. मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेला हा वेगवान गोलंदाज पुण्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. त्याला KKR ने लिलावात 20 लाख रुपयांची मूळ किंमत देऊन विकत घेतले.
या युवा खेळाडूचा जन्म 5 एप्रिल 2000 रोजी कुलगाम, जम्मू-काश्मीर येथे झाला. यापूर्वी तो 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. रसिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पदार्पण केले. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 6 टी-20 सामन्यात एकूण 4 बळी घेतले आहेत. त्याची प्रतिभा आणि क्षमता पाहून केकेआरने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.
या मोसमात केकेआरने आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. केकेआर तीन सामन्यांपैकी दोन विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही केकेआर विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल.