csk
Who could be the captain of Chennai Super Kings after Dhoni ?; Revealed by Suresh Raina

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सच्या पुढील कर्णधाराचे नाव सांगितले आहे. यावेळी रैनाने एका अशा खेळाडूचे नाव सांगितले आहे. जो धोनीचा खास खेळाडू आहे.

अनेक वर्षे सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारा आणि आयपीएलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेला डावखुरा फलंदाज रैनाने यावेळी जडेजाकडे संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हंटले आहे.

आयपीएलपूर्वीच्या पत्रकार परिषदेत रैना म्हणाला, “रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो हे संघाचे नेतृत्व करू शकतात. त्यांना खेळ चांगला समजतो आणि ते एमएस धोनीचे उत्तराधिकारी होऊ शकतात.”

आयपीएलमधील समालोचनासाठी पदार्पणाबद्दल विचारले असता रैनाने सांगितले की, समालोचन करणे खरोखर कठीण काम आहे. रैना पुढे म्हणाला, “मी त्यासाठी तयार आहे. माझे काही मित्र इरफान पठाण, हरभजन सिंग आणि पियुष चावला आधीच समालोचन करत आहेत आणि या हंगामात आमच्याकडे रवी शास्त्री देखील असतील. त्यामुळे मला वाटते की माझ्यासाठी हे सोपे होईल. तिथे मी माझ्या मित्रांकडून टिप्स घेऊ शकतो.”

रवी शास्त्री आणि सुरेश रैना 26 मार्चपासून आगामी IPL 2022 साठी स्टार स्पोर्ट्सच्या एलिट कॉमेंट्री पॅनलचा भाग असतील. रैना 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने CSK सोबत चार वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्रॉफी जिंकली आहे.

टी-20 मध्ये 6000 तसेच 8000 धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आणि IPL मध्ये 5,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होता. चॅम्पियन्स लीग टी-20 इतिहासात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.