ipl
When and where will the first match of IPL 2022 be played? Know everything

मुंबई : आयपीएल 2022, 15व्या हंगामाला शनिवारपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ असणार आहेत.

दहा संघांच्या या स्पर्धेत साखळी फेरीत एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने मुंबई आणि पुण्यातील तीन ठिकाणी खेळवले जाणार आहेत. कोरोनामुळे यावेळी कोणताही संघ घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. मात्र, मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर काही सामने खेळायला मिळणार आहेत. प्लेऑफच्या 4 सामन्यांचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.

यावेळी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचा थरारही पाहता येणार आहे. सध्या प्रेक्षक क्षमतेच्या केवळ 25 टक्के चाहत्यांना महाराष्ट्र सरकारची परवानगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “जशी स्पर्धा पुढे सरकेल तशी दर्शकांची संख्या वाढेल. कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे स्टेडियममध्ये अधिक संख्येने चाहते येण्याची शक्यता आहे. वानखेडेतील सध्याच्या नियमांनुसार सुमारे 10 हजार चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येऊ शकतील.

आयपीएल 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना 26 मार्च रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 आणि 7.30 वाजता खेळला जाईल. नाणेफेक दुपारी 3 आणि 7 वाजता होणार आहे.

आयपीएल 2022 मुंबईतील डीवाय पाटील, ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाईल. याशिवाय पुण्यातील एमसीए स्टेडियमवरही सामने होणार आहेत. IPL 2022 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. पण हॉटस्टारवर IPL 2022 च्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.