मुंबई : आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू मोईन अली केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मोईन अलीला अद्याप व्हिजा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत तो २६ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यातून हा खेळाडू बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे आधीच बाहेर आहे. आणि आता मोईन अलीच्या अनुपस्थितीमुळे संघावर निश्चितच परिणाम होईल. अशा स्थितीत पहिल्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरेल हे पाहावे लागेल.
मोईन अली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना खूप यशस्वी ठरला आहे. अशा स्थितीत त्याला पहिल्या सामन्यातून वगळणे चेन्नई संघासाठी चांगले संकेत नाहीत. मोईन अलीने खूप आधीच व्हिजासाठी अर्ज केला होता पण त्याची प्रक्रिया मध्येच अडकली आहे.
या सर्व प्रकरणावर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की, “आम्ही सोमवारी मोईन अलीच्या आगमनाची अपेक्षा करत होतो. पण तो मुंबईला कधी रवाना होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने 28 फेब्रुवारी रोजी व्हिजासाठी अर्ज केला होता परंतु पडताळणी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे त्याला अद्याप व्हिजा मिळालेला नाही.”
विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना KKR विरुद्ध होणार आहे. स्पर्धेची सुरुवातही या सामन्याने होणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. यावेळी चेन्नईचा संघ गतविजेता आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ
महेंद्र सिंह धोनी, दीपक चाहर, मोइन अली, रवींद्र जडेजा, अंबती रायडू, ऋतुराज गायकवाड़, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे, रॉबिन उथप्पा, तुषार देशपांडे, केएम आसिफ, राजवर्धन हंगारगेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सैंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीशन, क्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, माहीश तीक्ष्णा.