प्रत्येकाला आपले केस सुंदर, लांब आणि दाट असावेत असे वाटते. पण केस गळण्याच्या समस्येने लोक खूप त्रस्त आहेत. कोणत्या चुकांमुळे त्यांचे केस गळत आहेत, हेही त्यांना कळत नाही. जाणून घ्या कि कोणत्या चुकांमुळे केस पातळ होतात आणि गळायला लागतात.(Hair Care Tips)

केस पातळ होण्यामागील कारणे

हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. आजकाल स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, ज्यामुळे केस खराब तर होतातच पण सोबतच गळणे देखील सुरु होते.

जास्त शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात. शॅम्पूमध्ये हे केमिकल असते, त्यामुळे त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात.

महिलांनी सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. पण सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे केस फक्त पातळ होत नाहीत तर गळू लागतात.

अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असताना देखील ही समस्या उद्भवू शकते. अनेकदा ते त्यांच्या वजनाबाबत खूप जागरूक असतात, त्यामुळे ते त्यांच्या आहारातून आवश्यक पोषक घटक काढून टाकतात, ज्याचा परिणाम केसांवर होतो आणि केस पातळ होऊ शकतात.