नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी लवकरच मैदानावर उतरणार आहे, मात्र त्याआधीच धोनीने एक मोठे गुपित उघड केले आहे. खरं तर, आपल्या जर्सी नंबर 7 वर बोलत असताना धोनीने खुलासा केला आहे की त्याने हाच नंबर का निवडला.
अनेकदा खेळाडू आपला जर्सी क्रमांक खूप विचारपूर्वक निवडताना दिसतात. कोणत्याही खेळाडूला आपल्या जर्सीवर हवा तो क्रमांक पाहिजे असतो, अशातच महेंद्रसिंग धोनीच्या 7 क्रमांकाच्या जर्सीमध्येही असेच दिसून आले आहे. पण आता धोनीनेच याचा खुलासा केला आहे की, त्याने 7 नंबरची का निवड केली.
चेन्नई सुपर किंग्जने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना धोनी म्हणाला, “बर्याच लोकांना सुरुवातीला वाटले होते की 7 हा माझ्यासाठी लकी नंबर आहे, पण मी तो अगदी सोप्या कारणासाठी निवडला. माझा जन्म 7 जुलै रोजी झाला. तर हा सातव्या महिन्याचा सातवा दिवस आहे आणि त्यामुळेच मी 7 या नंबरची निवड केली.
या वर्षी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK चार वेळा विजेते ठरले आहे आणि चेन्नईने यावर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली तर ते पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या बरोबरीने असतील. यावर्षी CSK 26 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलला सुरुवात करेल.