मुंबई : अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी ‘जलसा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडण्यासाठी विद्या नेहमी मेहनत घेते हे तर आपल्याला माहीतच आहे. पण अश्या मेहनती विद्यासोबत एकेकाळी गैरवर्तनाचा प्रकार घडत होता. तिला कायम चित्रपटांमधून काढून टाकण्यात येत होते. अश्या परिस्थितीत विद्याची जी निराशा झाली होती याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

विद्या सध्या ‘जलसा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याप्रसंगी तिनं दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतीतून तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगा विषयी तिने सांगितलं आहे. विद्यानं सांगितलं, “मला अनेक चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आलं होतं. निर्मात बोलावून घ्यायचे. ऑडिशन व्हायची. पण त्यांचा नकार ठरलेला असायचा. अशावेळी मी कमालीची निराश झाले होते. मला काय करावं कळेना. जवळपास 13 चित्रपटांमधून मला बाहेर काढलं होतं. एका निर्मात्यानं माझ्याशी गैरवर्तन केलं आणि त्याच्या चित्रपटातून काढून टाकलं. तो ज्याप्रकारे माझ्यासोबत वागला त्यामुळे मला सहा महिने आरशात पाहण्याची भीती वाटत होती.” असा धक्कादायक यावेळी विद्याने केला आहे.

दरम्यान, विद्या बालननं टीव्ही मनोरंजन मालिका ‘हम पाँच’ पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. विद्या बालनचा चाहतावर्गही मोठा आहे. आता तिचा शेफाली शहा सोबत ‘जलसा’ नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तो 18 मार्चला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये मानव कौल, रोहिणी आणि इक्बाल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.