मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी बनारसला पोहोचले आहे. या दरम्यान, रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत रणबीरच्या फोन वॉल पेपरवर कोणाचा फोटो आहे हे समोर आले आहे आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की तो फोटो आलियाचा नसून दुसऱ्याच एका व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण? चला आपण पाहू.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसते की, रणबीरच्या हातात एक फोन आहे आणि त्यावर त्याचे वडील दिगवंत अभिनेते ऋषी कपूर यांचा फोटो आहे. या फोटोत ऋषी कपूर यांच्या हातात ब्रेसलेट, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर मोठे स्मित हास्य दिसत आहेत.

ऋषी यांचा हा फोटो त्यांनी 2018 मध्ये दुबईला जाणाऱ्या फ्लाइटमधून शेअर केला होता. हाच फोटो आजही रणबीरने त्याच्या वॉल पेपरला ठेवला आहे. यावरून हे तर स्पष्ट होते की, आजही रणबीरला त्याच्या वडिलांची खूप खूप आठवण येते. दरम्यान, व्हायरल झालेला हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर अनेक नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया ही देत आहेत.