मुंबई : अनेक चित्रपटांमध्ये काही अभिनेते व्हिलन ची भूमिका साकारतात तर काही जण हिरोची. त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांना स्‍टारच्‍या भूमिका त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तशाच वाटू लागतात. असेच काहीसे अभिनेता इमरान हाश्मीसोबत घडते. त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या रोमँटिक आणि किसिंग सीनसाठी ओळखला जातो. त्यामुळे बऱ्याच जणांना इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही असाच नॉटी असल्याचे वाटते. मात्र, पडद्यावर दाखवली जाणारी कथा ही पडद्यामागे ही तशीच असते असे नाही. अभिनय चांगला दिसण्यासाठी लागणारी मेहनत ही सहज सांगता येत नाही.

असाच काहीसा प्रकार इमरान हाश्मीसोबत ‘घनचक्कर’ चित्रपटाच्या सेटवर घडला. ‘घनचक्कर’ या चित्रपटात इमरान हाश्मीच्या विरुद्ध अभिनेत्री विद्या बालन होती. ‘घनचक्कर’ चित्रपटात दोघांनी अनेक किसिंग सीन दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यासोबत किसिंग सीन दिल्यानंतर इम्रान अडचणीत यायचा. याचा खुलासा अभिनेत्री विद्या बालन हिने नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर’मध्ये केला होता. शोमध्ये अभिनेत्रीने सांगितले होते की, प्रत्येक किसिंग सीननंतर इमरान तणावात असायचा.

त्याच्या अडचणीचे कारण म्हणजे विद्याचा पती आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर. किसिंग सीननंतर इम्रान विद्याला सांगायचा सिद्धार्थ काय बोलणार? तो पुढे म्हणायचा की तो मला माझ्या पेमेंटचा चेक देईल असे तुम्हाला वाटते? कारण ‘घनचक्कर’ चित्रपटाचा निर्माता विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर होता. असा हा चित्रपटात रोमांसचा बादशहा ओळखला जाणारा अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यात खूप वेगळा आहे.