मुंबई : सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट KGF 2 ची सध्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी जगभरातील 5 भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांच्या नजरा चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या बातम्यांवर रोखून आहेत. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. हो एक अशी व्यक्ती आहे की जिने चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच पाहिला आहे.

वास्तविक, ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी हा चित्रपट सेन्सॉर रूममध्ये पाहिला आहे. यानंतर त्यांनी इन्स्टास्टोरीवर KGF 2 बद्दल आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा मुकुट आहे. KGF 2 सुरुवातीपासून शेवटपर्यंत अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलने परिपूर्ण आहे. संवाद अतिशय धारदार आणि प्रभावी आहेत. चित्रपटाचे संगीतही चांगले आहे. पार्श्वभूमी स्कोअर आश्चर्यकारक आहे. विलक्षण चित्रपट. संपूर्ण चित्रपट हुक करून ठेवण्याचे काम दिग्दर्शकाने जबरदस्त केले आहे.’

‘सगळ्यांचा उत्तम अभिनय. हा केवळ कन्नड सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा नाही तर दिग्दर्शक प्रशांत नीलचा जागतिक दर्जाचा सिनेमा आहे. यश आणि संजय दत्त यांनी संपूर्ण चित्रपटाची लाइमलाइट चोरली. क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करून सोडेल.’ अशी प्रतिक्रिया उमेर संधूने पोस्टमध्ये दिली आहे. दरम्यान, या रिव्ह्यूनंतर चित्रपटाप्रति प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

‘KGF Chapter 2’ हा 2018मध्ये आलेल्या ‘KGF’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडाशी लढाई दाखवण्यात आली होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे, जी खूपच धोकादायक आहे. चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज हे कलाकार देखील झळकणार आहेत.