मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जेव्हाही कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावते. तेव्हा तिच्या जबरदस्त लुककडे सर्वांच्या नजराच अडकून राहतात. अश्याच एका कार्यक्रमात नुकतीच प्रियंकाने हजेरी लावली होती. यावेळी स्ट्रैपलेस ब्लाउज आणि ब्लॅक साडी परिधान केलेल्या प्रियांकावर सर्वांचीच नजर खिळून होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रियांकाने या ब्लॅक लुकसह एक ब्रेसलेट घातले फोटोंमध्ये दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल हे साध्य ब्रेसलेट असेल पण जेव्हा तुम्हाला या ब्रेसलेटची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण या ब्रेसलेटच्या किमतीत एखादी Audi, BMW किंवा Range Rover Evoque सुद्धा मिळू शकते. हे ब्रेसलेट बुल्गारी ब्रँडचे आहे. या ब्रेसलेटची किंमत चक्क 20,90,000 रुपये आहे. प्रियांकाच्या साडीवर 20 लाख 90 हजारांचे महागडे ब्रेसलेट आणि इमेरल्ड स्टडेड ईयरिंग्ज यामुळे तिचा लूक यावेळी हटकेच होता.

दरम्यान, यंदाचा ऑस्कर सोहळा 27 मार्चला होणार आहे. त्याआधी मंगळवारी 23 मार्च रोजी प्री-ऑस्कर इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रियंका चोप्रासह मिंडी कलिंग, कुमेल नानजियानी, अंजुला आचारिया, बेला बाजारिया, मनीश के. गोया आणि श्रुती गांगुली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसले. दरम्यान प्रियंका चोप्राची ऑस्कर सोहळ्यातील ही पहिलीच उपस्थिती नाही. याआधीच्या ऑस्कर सोहळ्यातही अभिनेत्री पुरस्कार देताना आणि नामांकनांची घोषणा करताना दिसली होती.