मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या अनेक काळापासून पॉर्नग्राफी प्रकरणामुळे चर्चेत पाहायला मिळत होता. या चर्चा दरम्यान राज सिनेमा पाहण्यासाठी जाताना मिडियासमोर स्पॉट झाला आहे. यावेळी मात्र राजने केलेल्या लुकमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राज कुंद्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राज कुंद्राने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. यासोबतच राजने चष्माही लावलेला दिसतो, पण खास गोष्ट म्हणजे या जॅकेटने त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकला होता, त्यामुळे त्याचा चेहरा कोणालाही दिसत नव्हता. रात्री उशिरा राज यांनी मुंबईत ‘बॅटमॅन’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज त्याच्या बॅटमॅन लूकसह पोहोचला पण युजर्सनी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले आहे.

राजच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही असे काम का करावे ज्याने तुमचा चेहरा लपवायची गरज नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुमचा चेहरा दाखवणे योग्य नाही. तुम्ही कामच अशी केली आहेत’. अश्या अनेक कमेंट करत नेटकर्यांनी राजला ट्रोल केले आहे.