oskar
... went on stage and hit the ear stone; The big event happened at the Oscars

नवी दिल्ली : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वीकारताना स्मिथ स्टेजवर रडला. अश्रू पुसत त्याने आपल्या टीमचे आभार मानले. पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्याआधीच विल स्मिथने स्टेजवर जाऊन कॉमेडियन ख्रिस रॉकसोबत अशी कृती केली, की पाहून सगळेच थक्क झाले. कॉमेडियन ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथचा त्याच्या एका विनोदात उल्लेख केला आणि हे ऐकून स्मिथने स्टेजवर चढून ख्रिसला कानशिलात लावली. ख्रिसने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर टिप्पणी केली होती.

G.I Jane 2 चित्रपटाबाबत ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. जेडाच्या टक्कल पडण्यावर भाष्य करताना ख्रिस रॉक म्हणाला की, टक्कल असल्यामुळेच या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ख्रिसने ऑस्करच्या मंचावर G.I Jane 2 या चित्रपटातून हा जोक पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेला विल स्मिथ उठला आणि त्याने स्टेजवर जाऊन ख्रिसला कानशिलात मारली. यानंतर स्मिथ ‘माझ्या बायकोचे नाव घाणेरड्या तोंडाने घेऊ नका’ असे ओरडताना दिसला.

दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर, विल स्मिथने त्याच्या कृतीबद्दल माफी मागितली. स्मिथ म्हणाला, “मी सर्वांची माफी मागतो. हा खूप सुंदर क्षण आहे.”