Weather Update : (Weather Update) संपूर्ण देशात सध्या पावसाचा हाहाकार सुरु आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक ठिकाणी पुर (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या देशात कशी आहे पावसाची परिस्थती.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेला संकटाचा (Heavy Rain) पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हवामान खात्याने (IMD) देखील 11 ऑक्टोबर म्हणजे आज अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

म्हणजेच आजही लोकांना पावसापासून दिलासा मिळत नाही. ऑक्टोबर महिन्यात जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत पावसामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटांच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

पावसाची ही फेरी आजही कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. यूपीमध्येही अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

उत्तराखंडपासून मध्य प्रदेशापर्यंत पावसाने कहर केला आहे

केदार खोऱ्यात दरड कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला, तर कटनी येथे पावसामुळे रुग्णालय जलमय झाले. रेवाडीमध्ये महामार्गालगत पाणी तुंबल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर लांबच लांब जाम आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथे मुसळधार पावसामुळे रहिवासी भागात पाणी साचले आहे. विजयराघव गड परिसरात रस्त्यांवर उभी केलेली वाहने पाण्यात बुडाली. ज्या रस्त्यावरून वाहने जात होती, त्या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते.

उत्तर प्रदेशातील पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्थ

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यूपीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात, केळी, मोहरी, कोबी, पालक, कोथिंबिरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचण अशी आहे की जोपर्यंत पुराचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाई मिळणे दूरच असते. पुराच्या हल्ल्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे हाहाकार माजले आहेत.

या भागात पाऊस पडेल

स्कायमेट वेदर या खाजगी हवामान अंदाज संस्थेच्या अंदाजानुसार दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ईशान्य भारत आणि त्याच्या लगतच्या भागात स्थानिक पातळीवर मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य भारताच्या काही भागात हलका पाऊस तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.