Weather Update : देशाची राजधानी दिल्लीमध्ये थंडीने (Winter) मुसंडी मारली आहे तर राजधानीपासून उत्तर भारतातील राज्यांपर्यंत तापमानात घट झाली आहे. वाढत्या थंडीमुळे दिल्लीच्या प्रदुषणामध्येही वाढ झाली आहे. जाणून घ्या कसे राहील वातावरण.

दिल्लीत संध्याकाळनंतर थंडी जाणवू लागली आहे. त्याच वेळी, हवेच्या गुणवत्तेची पातळी देखील खराब श्रेणीमध्ये नोंदविली जात आहे. हवामान खात्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण असेल आणि हलके धुके असेल. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर कमाल तापमान 32 अंशांवर जाऊ शकते, तर किमान तापमान 18 अंशांपर्यंत पोहोचू शकते.

राजस्थानच्या हवामानातही (Weather) विशेष बदल झाला आहे. सकाळी आणि रात्री थंडी जाणवते. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांवर पोहोचले आहे. चित्तोडगड, चुरू, अलवर, करौली, बारन, उदयपूरमध्ये थंडीचा तीव्र प्रभाव दिसून आला आहे. त्याचवेळी, आजच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते, तर किमान तापमान 17-18 पर्यंत नोंदवले जाऊ शकते.

या राज्यांमध्ये पाऊस

त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंडमध्येही हवामानातील बदल दिसून येत आहेत. तापमानात घट झाल्याने थंडी जाणवत आहे. हवामान खात्यानुसार दिवसेंदिवस तापमानात घट होणार आहे. या राज्यांमध्ये या आठवड्याच्या अखेरपर्यंत ढगाळ वातावरण (Rain) राहील. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्येही पावसाचा अंदाज आहे. त्याच वेळी, या राज्यांमधील किमान तापमान 16 ते 18 अंशांपर्यंत मोजले जाऊ शकते.

अशी असेल डोंगराळ भागाची अवस्था

याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये थंडीची विशेष अनुभूती पाहायला मिळत आहे. येथे तापमान 1-2 अंशांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर आजही अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलचे हवामानही थंड झाले आहे. येथील तापमानात अचानक घट झाली आहे. किमान तापमान 3 ते 4 अंशांवर नोंदवले जात असून, ते सध्या असेच राहील.