Weather Update : (Weather Update) सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसामुळे तापमान असून अनेक ठिकाणी थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. अशा परिस्थितीत पाणी तुंबण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) अनेक भाग जलमय झाले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातही पावसामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. वीज पडण्याच्या तसेच पावसाच्या घटनांमुळे राज्यातील अनेक भागात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम उत्तराखंडमध्ये दिसून आला आहे. उत्तरकाशी हिमस्खलनानंतर हवाई दल आणि इतर बचाव पथकांना खराब हवामानामुळे बचावकार्य करण्यात अडचणी आल्या. त्याचवेळी राजस्थानमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला तर अनेक जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण होते.

पावसामुळे दिवसाचे तापमान 5 ते 7 अंशांनी घसरले आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, पुढील तीन दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत यलो अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 8 ते 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. यादरम्यान येथील अनेक भागात वीज पडण्याचीही शक्यता आहे.

राजस्थानमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडू शकतो

हरियाणामध्ये 8 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत राजस्थानमध्ये 8 ते 11 ऑक्टोबरपर्यंत सतत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 8 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने येथे पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

पूर्व राजस्थानमध्ये 8 आणि 9 तारखेला आणि मध्य प्रदेशात 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडू शकतो. बिहारमध्येही 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडू शकतो. गुजरातमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.