Rain, storms and lightning asam
Rain, storms and lightning asam

Weather Update : सीतरंग चक्रीवादळाची (Cyclone) तीव्रता अधिक वाढली आहे. यामुळेच बांग्लादेशातील नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मेघालय या राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

बांगलादेशमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या सीतरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएफपीने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचे प्रवक्ते निखिल सरकारच्या हवाल्याने सांगितले की, बांग्लादेशातील बरगुना, नराइल, सिराजगंज या जिल्ह्यांमधून ही घटना समोर आली आहे.

हवामान पाहता सोमवारी कॉक्स बाजार समुद्रकिनाऱ्याजवळून हजारो लोकांना हलवण्यात आले. वृत्तसंस्था एएनआयने कॉक्स बाजारचे उपायुक्त मामुनुर रशीदच्या हवाल्याने सांगितले – जवळच्या शैक्षणिक संस्था देखील तयार ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा निवारा म्हणून वापर करता येईल.

बांगलादेशात सतरंग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळाचा इशारा कायम आहे. सीतारंगचे वादळ आज कधीही बंगालच्या सीमेवर धडकू शकते.

अशा परिस्थितीत उत्तर 24 परगणासह अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकांना सुंदरबनसह सागरी भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘सितरंग’ वादळ बंगालच्या सीमेवर धडकेल त्या वेळी वाऱ्याचा वेग 100 किमी प्रतितास असण्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालच्या ज्या भागात वादळाचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे, तेथे दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगणा येथे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो. यासोबतच मिदनापूर आणि मुर्शिदाबादमध्ये मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे.

याशिवाय कोलकाता, हावडा आणि हुगळीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा, मिदनापूर, मुर्शिदाबाद, कोलकाता येथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे.