Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

मान्सून जाता-जाता पुन्हा दणका देणार ! ‘या’ राज्यांमध्ये १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज

0

Weather Update : नैऋत्य मौसमीं वारे अर्थातच मानसून राज्यातील बहुतांशी भागांमधून माघारी फिरला आहे. आपल्या महाराष्ट्रातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, राज्यातील निम्म्या भागातून मान्सून परतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे.

मुंबई, पुणे, मराठवाडा विदर्भसह राज्यातील बहुतांशी भागांमधून मान्सून परतला आहे. दरम्यान, पुन्हा एकदा देशात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे मान्सून जाता जाता पुन्हा एकदा दणका देणार असल्याचे चित्र तयार होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम पाऊस सुरु झाला असून देशातील काही भागांमध्ये आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशातील डोंगराळ भागात गेल्या एक-दोन दिवसांपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल जम्मूच्या अनेक भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते ठप्प झाले होते. अशातच आता IMD ने आपल्या नवीन हवामान अंदाजात पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागात १५ ऑक्टोबरपर्यंत IMD ने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आज अर्थातच 11 ऑक्टोबर 2023 ला तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमध्ये हलका ते जोरदार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवली आहे.

13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान या भागात मुसळधार पाऊस होणार 

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आता 13 ऑक्टोबर पासून अर्थातच येत्या शुक्रवारपासून काश्मीर-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. या भागात 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

यामुळे जाता-जाता या भागाला मान्सून पुन्हा एकदा ओले चिंब भिजवणार आहे.  तसेच 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी पंजाब आणि उत्तर हरियाणामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगामी 24 तास या राज्यांसाठी ठरणार महत्त्वाचे 

हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, २४ तासांत, कर्नाटकची किनारपट्टी, उत्तर केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच ईशान्य भारत, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय, पश्चिम हिमालय, गोवा आणि रायलसीमा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या देशात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरणार आहे.

यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीला मात्र देशातील काही भागांमध्ये ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळत आहे. देशातील विविध भागात तापमानात वाढ झाली आहे. आपल्या महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमानातं वाढ झाली आहे. पण आगामी काही दिवसात राज्यात जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे.