mayank agrwal
"We have a capable team for the championship"; The Punjab Kings captain expressed confidence

मुंबई : आयपीएल 2022, 26 मार्च पासून सुरु होणार आहे. यावर्षीचा आयपीएल सीजन सर्वांसाठीच खास असणार आहे, कारण या मोसमात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरतील. त्यामुळे चाहते या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी सर्वच संघांमध्ये महत्वाचे बदल पाहायला मिळाले. बऱ्याच संघानी आपला कर्णधार बदलला तसेच खेळाडू देखील बदलेले दिसले. त्यामुळे आता सर्वंच संघ विजेदेपद पटकवण्याच्या हेतून मैदानात उतरणार आहेत.

आयपीएल 2022 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये देखील काही महत्वाचे बदल पहायला मिळाले. यावर्षी संघाचे कर्णधारपद मयंक अग्रवालकडे सोपवण्यात आले आहे. आयपीएल लिलावापूर्वी केएल राहुलने पंजाब संघ सोडल्यानंतर मयांक अग्रवालकडे संघाची कमान सोपवण्यात आली. दरम्यान, नवनियुक्त कर्णधार मयंक अग्रवाल याला असा विश्वास आहे की त्यांच्याकडे आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यास सक्षम संघ आहे.

अपयपीएलपूर्वी अग्रवाल म्हणाला की, “विजेतेपदासाठी आमच्याकडे सक्षम संघ आहे. यावेळी खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवावी लागेल. एक संघ म्हणून आम्ही लिलावात चांगली कामगिरी केली. ही स्पर्धा मुंबईत होणार हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे त्याआधारेच संघ निवडण्यात आला. आमच्याकडे संतुलित संघ आहे याचा आम्हाला आनंद आहे. कर्णधार म्हणून त्याची भूमिका संघात वाढली आहे पण फलंदाज म्हणून काहीही बदललेले नाही असे त्याचे मत आहे.

पुढे कर्णधार म्हणाला,”जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मी फक्त फलंदाज असतो. आमच्याकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत ज्यामुळे माझे काम सोपे होते. मला फलंदाज म्हणून सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. फलंदाजी क्रमाबद्दल आत्ताच काही सांगू शकत नाही पण शिखर धवन संघात सामील झाल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.”