afridi vs worner
... Warner-Afridi looks ugly in ongoing match; Video goes viral

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर असे काही घडले, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हे मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसले.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याच्या चेंडूचा बचाव केला. त्यांनतर शाहीन आफ्रिदीने एक चेंडू टाकला आणि थेट डेव्हिड वॉर्नरपर्यंत पोहोचला आणि दोघेही एकमेकांना खुन्नस देताना दिसले.

वॉर्नरकडे बाऊन्सर फेकल्यानंतर आफ्रिदी थेट फलंदाजाकडे गेला आणि त्याच्याकडे रोखून बघू लागला, त्यानंतर वॉर्नरनेही गोलंदाजाला खुन्नस दाखवली. दोघेही एकमेकांकडे बघू लागले आणि नंतर हसत-मस्करी करत गेले. मात्र यादरम्यान दोघांचा क्लिक झालेला एक फोटो व्हायरल झाला. डेव्हिड वॉर्नर कमी उंचीचा आणि शाहीन शाह आफ्रिदी उंच असल्याने हे चित्र अधिकच रंजक दिसते.

24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. आता ऑस्ट्रेलियन संघ 2022 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचे दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. आता हा तिसरा कसोटी सामना अनिर्णीत संपणार की या कसोटी सामन्याचा निकाल लागणार हे पाहावे लागेल. कसोटी सामन्याला अजून २ दिवस बाकी आहेत.