मुंबई : ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १४ वा सिझन लवकरच भेटीला येणार आहे. ‘केबीसी’मध्ये सहभागी होण्यासाठी ९ एप्रिल २०२२ पासून रजिस्ट्रेशन सुरु होत आहे. जर तुम्हालाही करोडपती बनायची इच्छा असेल तर, जाणून घ्या काय आहे रजिस्ट्रेशनची पद्दत.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अमिताभ बच्चन यांनी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. अमिताभ बच्चन आज रात्री ९ वाजता आपल्याला एक प्रश्न विचारतील ,ज्याचं उत्तर उद्या म्हणेज १० एप्रिल २०२२ रोजी ९ वाजेपर्यंत द्यायचे आहे. जी लोकं जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील, त्यांना पुढील राऊंडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

तुम्हाला तुमचा करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवा. वर्तमानपत्र वाचा. टी. व्ही. वरच्या बातम्या पहा. इतिहास, भूगोल अशा विषय़ांशी संबंधित पुस्तके वाचा आणि १० वी इयत्तेच्या पुस्तकांची विशेष तयारी करा. तसेच, ज्या लोकांचा IQ लेवल चांगला आहे, त्या लोकांशी जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा.

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो लवकरच सुरू केला जाण्याची शक्यता आहे. सोनी एंटरटेन्मेंटवर हा शो रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ची सुरुवात 2000 साली झाली आणि तेव्हापासून अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. फक्त तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता. गेल्या वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’ने 1000 वा भाग पूर्ण केला. शो दरम्यान, चित्रपट, क्रिकेटसह सर्व उद्योगातील सेलिब्रिटी देखील येतात आणि गेम खेळतात.