Volkswagen Virtus : (Volkswagen Virtus) फोक्सवॅगन ही एक नामांकित कार कंपनी असून लवकरच भारतात तयार केलेल्या फोक्सवॅगन Virtus या कारची परदेशात निर्यात केली जाणार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

ऑटोमेकर फोक्सवॅगन (Volkswagen) ग्रुपची उपकंपनी असलेल्या स्कोडा ऑटोने (Skoda Auto) आपली मध्यम आकाराची सेडान कार Virtus देशातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनी भारतातून निर्यात करणाऱ्या कारची संख्या वाढली आहे.

या निर्यातीअंतर्गत कंपनीने भारतातून मेक्सिकोला 3,000 हून अधिक युनिट पाठवले आहेत. कंपनी 2011 पासून भारतात बनवलेली वाहने परदेशात निर्यात करत आहे, फोक्सवॅगनने प्रथम आपल्या व्हेंटोची 6,256 युनिट्स दक्षिण आफ्रिकेत निर्यात केली.

अनेक वाहनांची निर्यात झाली आहे

फोक्सवॅगन (Volkswagen Group) ने या वर्षी जूनपर्यंत भारताबाहेर सुमारे 550,000 कार पाठवल्या आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक वाहने मेक्सिकोला निर्यात करण्यात आली आहेत. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भारतात ऑडी, पोर्शे, फोक्सवॅगन, लॅम्बोर्गिनी आणि स्कोडा सारख्या ग्रुप कार कंपन्यांच्या कारची विक्री करते.

फोक्सवॅगन व्हर्टसची वैशिष्ट्ये

Volkswagen Vertus च्या भारतीय आवृत्तीमध्ये 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 115PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

आणखी 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये देखील उपलब्ध आहे, जे 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. या आवृत्तीमध्ये 7-स्पीड DSG गिअरबॉक्सचा एकच पर्याय उपलब्ध आहे.

कारमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सनरूफ, टायर प्रेशर सिस्टम, एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, पॉवर-अॅडजस्टेबल ORVM, हवेशीर फ्रंट सीट्स, सहा एअरबॅग्ज सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.