मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा पुढील प्रोजेक्ट बॉलिवूड क्वीन कंगना रणौतसह असण्याची शक्यता आहे. एका मीडिया अहवालानुसार या दोघांमधील बातचीत प्राथमिक टप्प्यात असून पुढील बोलणी झाली असून काही महिन्यातच या सिनेमाची घोषणा होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काही आयडियाजवर काम करत आहेत. या संदर्भात त्यांचे बोलणे सुरू आहे. कंगना देखील विवेक अग्निहोत्री यांच्यासह काम करण्यास उत्सुक आहे. विवेक आणि कंगना यांची बाँडिंग चांगली आहे. तसेच, दोघांची आयडियोलॉजी देखील सारखीच आहे. या दोघांमधील बातचीत प्राथमिक टप्प्यात असून या दोघांच्या काहीच मीटिंग्स झाल्या आहेत.

दरम्यान, कंगनाने विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सचे कौतुक करत बॉलिवूडकरांवर टीका करत म्हंटल आहे, “सिनेमाच्या टीमचे खूप अभिनंदन. त्यांनी मिळून संपूर्ण चित्रपटसृष्टीने केलेली पापे धुवून काढली आहेत. बॉलीवूडची पापे धुवून काढली आहेत. एवढा चांगला चित्रपट बनला आहे आणि हा चित्रपट कौतुक करण्याजोगाच आहे, असं असताना इंडस्ट्रीतील लोक आपल्या बिळात उंदरांसारखे लपले आहेत त्यांनी बाहेर येऊन या चित्रपटाचे प्रमोशन करावे. ते केवळ बकवास चित्रपटांना प्रोत्साहन देतात.”