DHAWN
VIDEO: The young lady had rejected the running proposal because of the color

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळत आहे. स्टार फलंदाजाने अलीकडेच खुलासा केला होता की एकदा एका मुलीने केवळ त्याच्या रंगामुळे त्याला नाकारले होते.

पंजाब किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये धवनने स्वतःचा एक जुना किस्सा शेअर केला. यावेळी त्याने त्याच्या खाजगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला. त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुलीला प्रपोज केले होते पण शिखरचा रंग पाहून त्या मुलीने त्याला नकार दिला होता. मुलीचा नकार ऐकल्यानंतर धवनने ‘कोहिनूर हीरा’चा प्रस्ताव नाकारल्याचेही म्हंटले होते.

धवन या व्हिडिओमध्ये म्हणतो, “एकदा मी एका मुलीला प्रपोज केले होते आणि तिने मला नकार दिला होता. त्यावेळी आम्ही सतत खेळत होतो त्यामुळे आमचा चेहरा थोडा कला पडला होता. मुलीचा नकार ऐकून मी तिला “कोहिनूर हिरा.”ला नाकारल्याचे म्हंटले होते.”

धवन आयपीएलच्या गेल्या मोसमात फटकेबाजी करताना दिसला, पण चालू सीझनमध्ये अद्याप त्याला त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडता आलेला नाही. जर आपण धवनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्याच्या नावावर 5876 धावा आहेत आणि तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, 36 वर्षीय धवनने आयपीएल 2022 मध्ये पहिल्या तीन सामन्यांमध्ये 92 धावा केल्या आहेत.