मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील नवविवाहित जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. नुकतेच हे कपल एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विकी कौशल लग्नाच्या दीर्घ काळानंतर पत्नी कतरिना कैफसोबत गुप्त व्हेकेशनवर गेला आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ काल रात्री मुंबईत एकत्र दिसले. दोघांचे हे सर्व फोटो इंटरनेटवर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विकी कौशल कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे, तर कतरिना अतिशय स्टायलिश आउटफिटमध्ये दिसत आहे. काल रात्री मुंबईत विकी आणि कतरिनाला पाहिल्यानंतर पापाराझींनी दोन्ही स्टार्सचे अनेक फोटो क्लिक केले, ज्यामध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत होते. आता हे कपल व्हेकेशनसाठी कोठे गेले आहे यावर अद्यापही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, विकी आणि कतरिना यांनी गेल्यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. बॉलिवूडच्या बिग फॅट वेडिंग्जपैकी हे एक लग्न होतं. या दोघांनीही लग्नाचे विधी खूपच खाजगी ठेवले होते. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. तेव्हापासून हे कपल एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. मात्र, या दोघांना लग्न झाल्यावर त्यांच्या प्रोजेक्टमुळे कोठे एकत्र फिरायला जात आले नाही. यामुळे हे आता व्हेकेशनला गेले असल्याचे बोलले जात आहे.